Ad will apear here
Next
‘पालक-शिक्षक विद्यार्थ्यांचे आयकॉन बनावेत’
पुरस्कार प्राप्त शिक्षकांसमवेत नीला सत्यनारायण, रमेश शहा, सुनील वोरा, अभय शास्त्री, ओमप्रकाश पेठे, प्रकाश नारके, शरद पवार, सुनील रेडेकर, राजेंद्र गोयल.

पुणे : ‘मुलांना समान संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मला आरक्षण नको, आम्ही आमच्या गुणवत्तेवर इतरांशी स्पर्धा करून जिंकू, असे प्रत्येक विद्यार्थ्यांने म्हणावे. मुलांना चारित्रवान व प्रामाणिक बनविण्यासाठी शिक्षकाने स्वतः प्रामाणिक असायला हवे. पालक व शिक्षक मुलांचे आयकॉन बनावेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला माणूस होणे गरजेचे असून, त्यासाठी शालेय वयापासूनच चांगले संस्कार मिळावेत,’ असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.       

राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून दी इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांच्या वतीने व पुणे विद्यार्थी गृह यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या शिक्षक गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. विशेष मुलांना वर्षानुवर्षे शिक्षण देऊन सामाजिक कार्यास हातभार लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रांतपाल लायन रमेश शहा, सुनील वोरा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर व संयोजक प्रकाश नारके, शरद पवार, दिलीप निकम, शाम खंडेलवाल, राजेंद्र गोयल यांच्यासह सर्व विभागीय प्रांतअधिकारी उपस्थित होते.

नीला सत्यनारायण म्हणाल्या, ‘विशेष मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान लायन्स क्लब करत आहे, यासाठी त्यांना मी वंदन करते. विशेष मुलांना सहानुभूती न दाखवता त्यांच्या नकळत त्यांचे जीवन अधिक सोयीस्कर करून देणे, हे आपले काम आहे. शाळा आणि शिक्षकांचा प्रभाव हा मुलांवर पडत असतो. शिक्षक हे मुलांचे श्रद्धास्थान असतात. मुलांवर अनेक गोष्टींचे दडपण येते. अशावेळी शिक्षकांनी मुलांना विश्वासात घेऊन शिकवायला हवे. पालकांनी आपली स्वप्ने त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना आवडते करिअर करू द्यावे.’

नीला सत्यनारायण यांचा सत्कार करताना डावीकडून शरद पवार, सुनील रेडेकर, ओमप्रकाश पेठे, प्रकाश नारके, सत्यनारायण, रमेश शहा, सुनील वोरा, अभय शास्त्री, राजेंद्र गोयल.

रमेश शहा म्हणाले, ‘शिक्षक समाज घडवत असतो, राष्ट्रउभारणीच्या काम करत असतो; परंतु आज विद्यार्थ्यांकडे माहिती मिळविण्यासाठी इतर स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांकडे ज्ञानाचा खजिना असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांपासून उत्कृष्ट पालक घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. खरा शिक्षक हा विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देत असतो.’

नाशिकच्या विद्या फडके यांच्या ४० वर्षांच्या शिक्षकसेवेची दखल घेऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह व मानपत्र व रोख ३१ हजार रुपये ‘लायन्स’तर्फे देण्यात आले. फडके यांनी नाशिकला घरकुल संस्थेची स्थापना करून प्रौढ, अपंग तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी ४५ जणांना आतापर्यंत रोजगार मिळवून दिला आहे. या वेळी एकूण ४० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

प्रकाश नारके यांनी प्रास्ताविक केले. सारिता सोनावले, गंधाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शाम खंडेलवाल यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZSXBS
Similar Posts
पुणे विद्यार्थी गृहाचा १०९वा वर्धापन दिन साजरा पुणे : समाजातील गरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांचा आधारवड असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाचा १०९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या वेळी उपस्थिती लावली. संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी संस्था
‘लायन्स क्लब’तर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर मार्गदर्शन पुणे : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात दुष्काळाचे भीषण संकट ओढावले आहे. यंदाच्या या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्रीतर्फे १० मे २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक रस्त्यावरील
‘आयएमईडी’मध्ये वृक्षारोपण पुणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) वृक्षारोपण करण्यात आले.
नेत्रतर्पण शिबिराचा २०० जणांना लाभ पुणे : तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात जवळपास २०० जणांनी नेत्रतर्पण केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language